Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वसुंधराने केला नारी शक्तीचा सन्मान

 


फलटण चौफेर दि १२

सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना, सोलापूर जिल्हा, सोलापूर संलग्न वसुंधरा महिला मंडळाने जागतिक महिला दिनाचे व अनंत अडचणीवर मात करून आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना अभिवादन करून महिला दिन साजरा केला. सोबतच 

पांचाळ सोनार समाजातील अत्यंत सकारात्मक जीवन जगलेल्या, प्रत्येकाच्या  आयुष्यात परमेश्वराने कांही ना कांही त्रुटी ठेवलेल्या असतात, पण त्या त्रुटीचा विचार न करता परमेश्वराने जे चांगले दिलेले आहे त्याचा आनंद मानून सकारात्मक व आनंदी जीवन कसे जगावे याचे आदर्श वस्तूपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या श्रीमती तारामती बाळकृष्ण जमखंडीकर यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरवात केली.दिनांक 10 मार्च रोजी समाजातील  आदर्श माता, स्वयं उद्योग करणाऱ्या  तसेच शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान,

कार्यक्षम कर्तबगार महत्वाकांक्षी अशा महिलांचा सुवर्ण आदर्श माता पुरस्कार, सुवर्ण नारी शक्ती पुरस्कार आणि यशस्विनी उद्योजीका पुरस्काराने गौरविण्यात आले.  सदरचा कार्यक्रम शुक्रवार पेठेतील श्री कालिका देवी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  याप्रसंगी अध्यक्ष मा. सौ शिल्पा ओसवाल मॅडम तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ् मा. डॉ सौ सारिका देगावकर मॅडम आणि आहार तज्ञ् तथा ताण तणाव व्यवस्थापन तज्ञ श्रद्धा पवार उपस्थित होत्या. वरील मान्यवरांनी अनुक्रमे महिला सक्षमीकरण, स्त्री रोग संबंधित आणि ताण तणाव व्यवस्थापन बाबत सविस्तर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमात पुढील नारी शक्तींचा  सन्मान करण्यात आला त्यात ---सुवर्णं आदर्श माता पुरस्कार --सौ चंद्रप्रभा कारीकर, सौ अनुप्रिया  औसेकर, श्रीमती प्रभावती महामुनी, सौ निशिगंधा पोतदार, गं. भा.स्व. रतन  पोतदार ( मरणोत्तर ) सुवर्णं नारी शक्ती पुरस्कार -- तहसीलदार सौ शिल्पा ओसवाल, स्त्री रोग  तज्ञ् डॉ सारिका देगावकर,  सौ शुभदा जेऊरकर , सौ पल्लवी   पोतदार -भास्करे , सौ पल्लवी पंडीत , प्रा. इंजि. सौ अश्विनी  पंडीत, इंजि. सौ अश्विनी पोतदार, प्रा. कुमारी स्नेहा वेदपाठक. यशस्विनी उद्योजीका सन्मान पुरस्कार --सौ. वंदना पंडीत, कुमारी अंकिता वेदपाठक, जेऊर ( करमाळा ) यांना सन्मानपत्र व विशेष स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राजश्री पोतदार यांनी केले. प्रास्ताविक सौ मेधा मैंदर्गीकर यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव सौ पल्लवी महामुनी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा सौ मृणालिनी मैंदर्गीकर, उपाध्यक्ष सौ संध्या कळमणकर, सौ अंजली कुरुलकर, सचिव सौ साधना वेदपाठक, कोषाध्यक्ष सौ अनुराधा पत्तार,सौ रुपाली दीक्षित  , सौ अंजली दीक्षित, सौ संध्या पोतदार, सौ शुभांगी महामुनी, सौ गौरी उळेकर, सौ जुईली दीक्षित, सौ पदमजा महामुनी, सौ मयुरा पोतदार , सौ संगीता पोतदार, सौ सुनीता पंडीत यांनी तसेच गौरव समितीचे सर्वश्री संजय मैंदर्गीकर, संतोष कळमणकर, वसंत पोतदार, विजयकुमार पोतदार, गजानन सोनार मंदिर कर्मचारी श्री जाधव या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.