फलटण चौफेर दि २०
आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्या दिनांक २१ रोजी फलटण मधील अनंत मंगल कार्यालय येथे सायंकाळी ४ वाजता माण, खटाव,उत्तर कोरेगाव व फलटणच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून उद्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आगामी काळात कोणती भूमिका घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे यामुळे फलटण व माळशिरस मध्ये रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर किंवा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्याची लोकसभा निवडणूक लढवावी असा फलटण येथील कार्यकर्त्यांमधून आग्रह आहे
काल मुंबई मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्रीमंत रामराजे यांनी मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन माढ्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय जाहीर करीन असे सांगितले होते त्यामुळे उद्या होणाऱ्या फलटण येथील अनंत मंगल कार्यालयातील राष्ट्रवादी रामराजे श्रीमंत रामराजे यांच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे