फलटण चौफेर दि २०जाखिनवाडी ता कराड येथून दोन वर्षाकरिता तडीपार असलेल्या पृथ्वीराज बळवंत येडगे वय २९हा जाखीनवाडी येथे आला असता त्याला कराड पोलिसांनी अटक केली
याबाबत कराड शहर पोलीस ठाणकातून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक १९ रोजी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना विश्वसनीय बातमीदार मार्फत बातमी प्राप्त झाली की, बिरोबा मंदिर जखिनवाडी ता. कराड येथे २ वर्षाकरीता तडीपार असलेला पृथ्वीराज बळवंत येडगे हा त्या ठिकाणी आला आहे त्याबाबत त्यांनी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व पथकास माहिती देवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने बिरोबा मंदिर जखिनवाडी ता. कराड सापळा रचुन त्याला जागीच पकडले त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के. एन. पाटील यांचेमार्गदर्शनाखाली पो. हवा. अमित पवार व डी. बी. टिम करीत आहे