फलटण चौफेर दि २१
ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी खा. शरद पवार आज फलटण दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ते राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या दौऱ्यात सातारा व माढा लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. या दौऱ्यात शरद पवार काय बोलतात? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
खा. शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सुभाषराव शिंदे यांची फलटण तालुक्यात ओळख होती. त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन करण्यासाठी खा. शरद पवार हे गुरूवारी दुपारी फलटण दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. खा. पवार हे या दौऱ्यात सातारा व माढ्याचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
