फलटण चौफेर दि १६
खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते साखरवाडी पिंपळवाडी येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन समारंभ पार पडला यावेळी साखरवाडी चे उपसरपंच अक्षय रुपनवर, महानंदा डेअरीचे व्हाईस चेअरमन डी के पवार,माजी सरपंच विक्रमसिंह भोसले ग्रामपंचायत सदस्य विक्रम ढेंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती साखरवाडी व पिंपळवाडी गावातील भूमिपूजन केलेली विविध विकास कामांमध्ये साखरवाडी अंतर्गत रस्ता करणे नागरी सुविधा २० लाख,गणेशनगर ते विठ्ठल मंदिर रस्ता कोंक्रेटी करणे २० लाख, पिंपळवाडी येथील म्हस्कोबा मंदिर सभा मंडप १० लाख,साखरवाडी बाजार पेठ रस्ता डंबरीकरण करणे १५ लाख, आंबेडकर नगर दलित वस्ती येथे रस्ता कोंक्रेटी करणे १० लाख, साखरवाडी, पिंपळवाडी रस्ता कोंक्रेटी करणे १० लाख,साखरवाडी येथे दलित वस्ती अंतर्गत रस्ता क्ररणे ५ लाख, साखरवाडी येथे मुस्लिम समाज दफन भूमी येथे स्ट्रीट लाईट बसविणे या कामांचा समावेश आहे