Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत विक्रमसिंह भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

 


फलटण चौफेर दि १६ माढा मतदारसंघाचे  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये साखरवाडी ग्रामपंचायतीचे मा. सरपंच  विक्रमसिंह आप्पा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला साखरवाडी येथील एस टी बस स्थानकाच्या आवारात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सरपंच ग्रुपचे सोशल मीडिया प्रसारक आणि विक्रमसिंह (आप्पा ) भोसले यांचे  समर्थक दत्तात्रय बाबासाहेब बोडरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी अक्षय रुपनवर-उपसरपंच.

विक्रम ढेंबरे ग्रा.पं.सदस्य.मयुर लोखंडे ग्रा.पं.सदस्य. महानंदाचे व्हाईस चेअरमन डि.के.पवार, राजेंद्र पवार.संपत पवार.  संभाजी जाधव.आनंदा जाधव.अनिल कुराडे.विश्वजीत भोसले,सचिन भोसले.विकी भोसले.बंटिभैय्या शेख यांची प्रमुख उपस्थिती होती

दत्तात्रय बोडरे यांच्या सुविद्य पत्नी सौ अपर्णा दत्तात्रय बोडरे  या सध्या साखरवाडी पिंपळवाडी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य म्हणून कार्यरतआहेत विक्रमसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळवाडी येथील वार्ड क्रमांक ६ मधून अपर्णा बोडरे काम करत आहेत या वाढदिवसाचे औचित्य साधून मा. सरपंच विक्रमसिंह भोसले यांना यावेळी ग्रामपंचायत विकासपट्टू प २०२४ चा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला शाल श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते  साखरवाडी ग्रामपंचायतचे मा. सरपंच माणिकआप्पा भोसले अभिजीतभैया निंबाळकर मारुती माडकर उत्तम मोहिते सुरेश पवार संग्रामदादा औचरे रवींद्र तोरणे दिनेश रावळ पप्पू रणवरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती 

साखरवाडी पिंपळवाडी वार्ड क्रमांक ६ मधील भोसले वस्ती येथील बंदिस्त गटर करणे पिंपळवाडी भोसले वस्ती रस्ता करणे भोसले वस्ती मोहिते घर बंदिस्त गटर करणे पिंपळवाडी सुरेश काटकर घर रस्ता करणे पिंपळवाडी कांबळे घर रस्ता खडीकरण करणे तसेच येथील वाढीव पाणीपुरवठा पाईपलाईन करणे विठ्ठल मंदिर रस्ता करणे दुष्काळआळी रस्ता करणे पिंपळवाडी येथील मस्कोबा मंदिर सभामंडप करणे इत्यादी विकास कामे ग्रामपंचायत सदस्य अपर्णा दत्तात्रय बोडरे यांच्या प्रयत्नातून होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले २५ ते ३० वर्षापासून ही रखडलेली कामे विक्रमसिंह भोसले यांच्या सहकार्यातून होत असल्याचे अपर्णा दत्तात्रय बोडरे यांनी यावेळी सांगितले

 खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून या कामांना गती मिळाली असून या कामी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असून त्याचबरोबर या भागातील सर्वसामान्य कुटुंबातील अभ्यासू व्यक्तिमत्व दत्तात्रय बोडरे यांचेही विशेष प्रयत्न असल्याचे दिसून येत आहेत 

 माढा मतदारसंघाचे लोकप्रिय  खासदार‌ रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून साखरवाडीच्या सर्वांगीण विकास कामासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध होणार असून मा. सरपंच विक्रम सिंह भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वाढीव पाणीपुरवठा योजना रुपये रक्कम ५ कोटी व तसेच पिंपळवाडी साखरवाडी अंतर्गत रस्ते करणे १ कोटी अशा अनेक विकास कामासाठी सर्वाधिक निधी देण्याचे खासदार यांनी यावेळी जाहीर केले त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने  खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी यांचे आभार व्यक्त करून विक्रमसिंह (आप्पा ) भोसले यांना पुढील वाटचालीस सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.