फलटण चौफेर दि १६
शेरेचीवडी ता फलटण गावाच्या हद्दीत शनिवारी दि १६ रोजी रात्री २.५० वाजता गावातील शेरेचीवाडी-वाठार निंबाळकर हद्दीवरील चिंतामणी डि.पी येथे ३-४ चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत आणि कटरच्या साह्याने डी.पी कट करून चोरीचा प्रयत्न करत आहेत,हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील दयानंद नारायण चव्हाण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी दाखल झाली संपूर्ण गाव सतर्क झाले आणि तात्काळ घटनास्थळी आले हे लक्षात येताच चोर त्यांची १ दुचाकी,१५ किलो एलपीजी गॅस सिलेंडर, ऑक्सीजन सिलेंडर,कात्री,कटर,शिडी असे सर्व साहित्य जाग्यावर सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.