फलटण चौफेर दि १६
पुणे पंढरपूर पालखी मार्गाचे काम वेगात सुरू असून यापैकी सुरवडी , निंभोरे व तांबमाळ येथे बाह्यवळण मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे .कामाचा कालावधी संपला असला तरी आगामी पालखी सोहळ्या पूर्वी काम संपवण्याचे आव्हान अधिकारी व कंत्रातदारावर आहे आज निंभोरे येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले
अनेक महिने काम सुरू असल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती लोणंद ते नातेपुते या मार्गावरील अनेक ठिकाणी काम चालू असले तरी ते अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू असते
निंभोरे पूल तयार झाल्यावर फलटण कडून पुण्याकडे जाणारी वाहतुक पुलावरून सुरू आहे हा पूल वाहतुकीस खुला केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे याचं प्रमाणे सुरवडी पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणीही नागरिकांनी केली