फलटण चौफेर दि १६
माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खासदार पदाच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी ही मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला आहे. साखरवाडी ता फलटण येथील सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात कामासाठी फलटणला जावे लागत होते. यामुळे लोकांचा फलटणला जाण्या-येण्यासाठी पैसे व वेळ वाया जात होता व त्रास पण सहन करावा लागत होता. साखरवाडी ते फलटण हे अंतर साधारण १५ किलोमीटर चे आहे. एवढ्या लांबून लोकांना तहसील कार्यातील कामासाठी यावे लागत होते. ही सर्वसामान्य जनतेची खूप मोठी अडचण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी समजून घेतली व या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून साखरवाडी येथे तहसील कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न केले असता आज साखरवाडी येथे तहसील कार्यालय होण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळाली असुन तहसील कार्यालय सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. लवकरच याची अंतिम मंजुरी मिळेल अशी खासदार माहिती खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली