फलटण चौफेर दि १२ : हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीची मुंबई -पुणे- सोलापूर ही पाईपलाईन सातारा जिल्हयातुन जात असून सदर पेट्रोलियम पाईपलाईनबाबत काही दुर्घटना घडल्यास घटनास्थळ कशा प्रकारे हाताळावे यासाठी तरडगांव ता फलटण येथे हे मॉकड्रील घेण्यात आले. सदर मॉक ड्रीलसाठी तरडगाव गावाची निवड केल्याबददल सरपंच जयश्री चव्हाण यांनी कंपनीचे आभार मानले.यावेळी जिल्हा आपत्ती विभागाचे अधिकारी देविदास ताम्हाने, पोलीस अधिक्षक कार्यालयातील लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, मॅग्नेशिया केमीकल कंपनीचे अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे उपमहाप्रबंधक बी. व्ही. श्रीधर तसेच कंपनीचे आर ओ यु अधिकारी गौरव गुप्ता, जयदीप शुक्ला, प्रतिक फुलारी, अभिषेक खरे, मनोज पाटील व इतर अधिकारी, IOCL चे अधिकारी, मेडिकल असोसिएशन बनसोडे, अतुल चव्हाण ,सुनील शिंदे, तनुजा गायकवाड,कामगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यकमाचे सुत्रसंचालन मयुरी शहाणे व आभार प्रदर्शन बी. व्ही. श्रीधर यांनी केले.