फलटण चौफेर दि १३
सुरवडी ता फलटण येथे न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त उद्या गुरुवार दि १४ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यालयांमध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी खाली दिलेल्या लिंक मध्ये आपली माहिती भरून सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
https://surveyheart.com/form/65f050d249cec872d060adb6
तसेच ज्यांची मुले या शाळेमध्ये नाहीत तरीही या कार्यक्रमांमध्ये सर्व महिला भाग घेऊ शकतात . सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम खुला आहे
ज्या महिलांना ही लिंक भरता येणार नाही त्यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजर राहावे .त्या महिलांसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी ही लिंक भरण्याची सोय करण्यात आली आहे