Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रामराजेंनी केलेल्या कामाचे श्रेय इतरांनी घेणे थांबवावे- आ. दिपक चव्हाण

 


तरडगाव (नवनाथ गोवेकर)

विकास कामे करत असताना कोणताही प्रकारचा दुजाभाव न करता रामराजेंनी गेली तीस वर्षे विविध ठिकाणी विकास कामे केली आहेत मात्र अलीकडच्या काळात काही लोक या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत. अशा लोकांनी रामराजेंनी केलेल्या कामाचे श्रेय घेणे थांबवावे असे मत आमदार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

         फलटण तालुक्यातील तरडगाव येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनिकेतराजे नाईक निंबाळकर , माजी सभापती वसंतराव गायकवाड, माजी उपसभापती दिलीपराव अडसूळ, मालोजीराजे बँकेचे संचालक सुभाषराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

          दीपक चव्हाण पुढे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात रामराजे हे विधान परिषदेचे सभापती असताना सिंचन योजना राबविण्याची मान्यता घेतली होती. मात्र दुर्दैवाने पुढे आघाडी सरकार पडले.  त्यानंतर चे काम हे नंतरच्या काळात झाले. मात्र  त्याच श्रेय दुसरेच कोणी घेत आहेत. पाणी अडवण्याचा दृष्टीने रामराजे नाईक-निंबाळकर मंत्री असताना कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यावर निरा देवघर सह अनेक प्रकल्प त्या काळी सुरू झाले. धरणे बांधून ते पाणी वाघोशी पर्यंत आणण्यासाठी रामराजेंनी मोठा संघर्ष केला आहे.

           यावेळी अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच जयश्री चव्हाण, बाबासाहेब खरात, मोहन अडसूळ, दादासो नरुटे, के. के. गायकवाड, राजेंद्र गायकवाड, नामदेव कोरडे, सुरेंद्रकुमार घाडगे, शहाजी गायकवाड आदी मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक  उपसरपंच प्रशांत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन  संतोष कुंभार यांनी केले. तर आभार के जी गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.