खराडेवाडी शिवाजी भोसले
फलटण लोणंद पालखी महामार्गावर काळज गावाच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने जुबेर कच्छी वय ३२ राहणार लोणंद हा युवक जागीच ठार झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी लोणंदहुन फलटणच्या दिशेने जात असलेला कंटेनर क्रमांक एम एच ४८ ए आर ८१६३ ला पाठीमागून आलेल्या दुचाकी क्र एम एच ४५ एल ने जोरदार धडक दिली यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जुबेर कच्छी याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे