फलटण चौफेर दि १४
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शिंदेवाडी येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले सुभाषराव शिंदे यांनी दि १३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पुण्यात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला त्यांचे पार्थिव पुण्याहून दि.१४ रोजी पहाटे फलटण येथील 'जिद्द' बंगल्यावर आणण्यात आल्यानंतर अंतिम दर्शनासाठी फलटण शहर व तालुकावासीयांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून अंत्ययात्रा फलटण येथून त्यांच्या मूळ गावी शिंदेवाडी कडे नेण्यात आली यावेळी रस्त्यावर ठिकठिकाणी हजारो नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले शिंदेवाडी येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणल्यानंतर गावातील मंदिरासमोर पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवले होते
दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे, ॲड.नरसिंह निकम यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय सुभाष भाऊ यांना श्रद्धांजली अर्पण केली.
३ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यविधी करण्यात आला अंत्यविधी संस्कारप्रसंगी प्रल्हादराव साळुंखे पाटील, डि.के.पवार, दिलीपसिंह भोसले, अभयसिंह जगताप, रविंद्र बेडकिहाळ, महेंद्र सूर्यवंशी बेडके, धनंजय साळुंखे पाटील, शंकरराव माडकर,किरण साळुंखे पाटील, यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामीण भागातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.