फलटण चौफेर दि १५फलटण येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रारंभ शुक्रवार, दि. १५ मार्च रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे
शिंगणापूर रोडला जुने लेडिज हॉस्टेलइमारतीत हे कार्यालय सुरू होणार असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. अरुण लाड, आ. जयंत आसगावकर, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शिवेंद्रराजे, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, परिवहन अधिकारी भिमनवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे