फलटण चौफेर दि १५राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे दिनांक १३ रोजी अल्पशा आजारांनी निधन झाले त्यांच्या निधनानंतर संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुभाषराव शिंदे यांच्या फलटण येथील 'जिद्द' या निवासस्थानी शिंदे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांच्याबरोबर इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे हेही उपस्थित होते