Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ३ लाख ९४ हजार हून अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप

 



सातारा दि. १५ (जिमाका) : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका एक शिधाजिन्नस संच र.रु.१००/- च्या दराने ई-पॉस मशिनद्वारे वाटप करावयाचे होते. सदर शिधाजिन्नस संचामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे ६ शिधाजिन्नसांचा समावेश केलेला होता.

त्यानुसार सातारा जिल्ह्याकरीता एकूण ३ लाख ९५ हजार १२८ शिधाजिन्नस संचाची मागणी नोंदविण्यात आलेली होती.  त्यानुसार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व गोदामात १००% शिधाजिन्नस प्राप्त झाले.

उशिरा शिधाजिन्नस प्राप्त होऊनही जिल्ह्याने अल्पावधीतच जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ७७१ शिधापत्रिकाधारक यांना (९९.९%) आनंदाचा शिधाचे वितरण करुन राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.