Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ओबीसी संघर्ष समितीस आ गोपीचंद पडळकर यांची भेट : माढ्याच्या एल्गार मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 



फलटण चौफेर दि १८

             फलटण येथे  झालेल्या भाजपाच्या वचनपूर्ती सोहळ्या साठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सह अनेक मात्तबर राजकीत नेत्यांनी हजेरी लावली नेत्यांचा दौरा अतिशय व्यस्त होता यातूनही वेळ काढत आमदार गोपीचंद पडळकर यांनी फलटण च्या ओबीसी नेत्यांची घेतलेली संत सावतामाळी मंदिर येथील खाजगी भेट राजकीय क्षेत्रात भुवया उंचवयला लावणारी होती फलटण तालुक्यातील ओबीसी संघर्ष समितीच्या नेत्यांशी घेतलेली भेट काल दिवसभर चर्चेचा विषय ठरली 


               आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी ओबीसी नेत्यांचे असणारे सख्य फलटणच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे त्यांना अगदी नावानिशी व गावासह ओळख देत त्यांचा लोकसंपर्क किती दांडगा आहे  हे दाखवून दिले येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ओबीसी सह पडळकर फॅक्टर आपले वजन दाखवून देणार असे दिसते 

              फलटणच्या संत सावतामाळी मंदिर येथे मा मंत्री सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी संत सावता महाराज यांचे दर्शन घेतले ओबीसी नेत्यांच्या भेटीत माढा येथे होणाऱ्या एल्गार सभेस बहुसंख्येने हजेरी लावण्याचे आवाहन यावेळी पडळकर यांनी  केले एकजुटीने रहा व ओबीसी साठी काम करा असा संदेश त्यांनी यावेळी दिला 

               यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे , सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ , विजय शिंदे , शरद कोल्हे , विडणीचे सरपंच सागर अभंग , फलटण तालुका शिवसेना प्रमुख पिंटू इवरे ओबीसी अभ्यासक व वक्ते गिरीश बनकर बापूराव बनकर बंडू शिंदे प्रवीण फरांदे उद्योजक राहुल शिंदे यांच्या सह विविध गावातील ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.