फलटण चौफेर दि १८
कृषिप्रधान देशात शेती व शेतमालाला असणारे महत्व त्याची बाजारपेठ त्यातील व्यवहार ज्ञान मुलांना कळावे याउद्देशाने फडतरवाडी तालुका फलटण येथील जिल्हा परिषद शाळेत आनंदोत्सव या शालेय बाजाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना बाजारात होणारी भाजीपाल्याची, फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
शाळेतील मुलांनी यासाठी अथक परिश्रम घेत शेतातून भाजी पाला उपलब्ध केला होता तसेच अनेक खाद्य पदार्थ यावेळी विक्रीसाठी मांडले होते भाजी घ्या भाजी च्या आवाजाने शाळेचा परिसर बाजारपेठे प्रमाणे फुलला होता गावातील नागरिकांनी या बाजारात प्रत्यक्ष खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले
यावेळी मुला-मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, चहा स्टॉल, किराणा स्टॉल, हॉटेल स्टॉल आदी दुकाने शाळेच्या आवारात थाटली होती. बाजारातून होणारी पैशांची देवाण घेवाण, नाण्यांची ओळख, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर, भाजीपाला मालक व गिऱ्हाईक यांच्यात पैशांवरून होणारी घासाघीस, हमरीतुमरी, बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतल्याचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले गावांमधील बहुतांश नागरिकांनी भोगी सणासाठी लागणारा सर्व भाजीपाला, फळभाज्या इथूनच खरेदी केल्याने या शालेय बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला एम डी गायकवाड व शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले