Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण येथे दि.२१ रोजी सातारा जिल्हा सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा



फलटण चौफेर दि.१९ -  सांगली येथे दि. ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान  महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ॲथलेटिक्स चँम्पियनशिप ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  सदर स्पर्धेसाठी  सातारा जिल्हास्तरीय निवड चाचणी फलटण येथे रविवार दि.२१ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना पुढे  राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहे. तरी स्पर्धकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.


मुधोजी महाविद्यालय, मैदान, फलटण  येथे होणारी सातारा सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा ही स्पर्धा दि. २१ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSca12XXnxBSChhKN_S6kQLjUBYXYUPS_y32iP7WIKQIDRMEsA/viewform

वरील लिंकवर असणाऱ्या गुगल फॉर्म  मध्ये आपल्या जन्मतारखेनुसार आपल्याच गटात आपली माहीती भरणे बंधनकारक असेल .
एका खेळाडुस वैयक्तिक क्रिडाप्रकारात फक्त दोनच स्पर्धेमध्ये आपले नांव नोंदवता येईल.

स्पर्धेतील वयोगट पुढीलप्रमाणे आहे.
वयोगट व जन्मतारीख - ८  वर्षे मुले - मुली (११ फेब्रुवारीते २०१६ ते ९  फेब्रुवारी २०१८),
१० वर्षे  मुले - मुली  ( ११ फेब्रुवारी २०१४ ते ९ फेब्रुवारी २०१६, 
१२  वर्षे मुले - मुली (११ फेब्रुवारी २०१२  ते ९  फेब्रुवारी २०१४)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.