फलटण चौफेर दि २१
राजुरी तालुका फलटण गावाच्या हद्दीत साधू बुवा मंगल कार्यालयासमोर दि २० रोजी रात्री ८ वाजता ऊस वाहतूक करत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच ११ ७६०१ अडवून 'तुला माहीत नाही का दरवाढीसाठी ऊस वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे, तरी तू वाहतूक का करतोस' असे म्हणून शिवीगाळ करून काठीने, दगडाने, लाथाबुक्याने मारहाण केल्याची फिर्याद चालक पोपट विठोबा गावडे वय ७५ राहणार गुणवरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात दिली असून संशयित धनंजय बाळासाहेब ठणके, गणेश शिवाजी साळुंखे, नितीन भानुदास,( संपूर्ण नाव माहित नाही) संजय दशरथ साळुंखे, सचिन वाघमोडे सर्व राहणार मुंजवडी तालुका फलटण सुधाकर दामू माळवे, संभाजी घाडगे, किरण पवार, वैभव गावडे,राजू माळवे, चंदू इंगळे, नामदेव खटके सर्व रा राजुरी तालुका फलटण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास स फौ सावंत करीत आहेत