फलटण चौफेर दि २१
फलटण तालुक्यातील २८ गावांमध्ये कुणबी नोंदी सापडले असून या नोंदी त्या गावांमध्ये प्रसिद्ध केल्या असून संबंधित कुणबी नोंदी सापडलेल्या नातेवाईकांनी आपली वंशावळ तयार करून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे फलटण तालुक्यातील तरडफ, तडवळे, ढवळ, टाकळवाडा, गिरवी, कुरवली बुद्रुक, काळज, आसू, आळजापूर, हिंगणगाव, सोमंथळी, सुरवडी, खुंटे, होळ, सांगवी, विडणी, भाडळी बुद्रुक, खामगाव, विंचुर्णी, भाडळी खुर्द, राजुरी, साठे, मिरगाव, पिंपरद, निरगुडी, निंभोरे व निंबळक या गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या असून फलटण तालुक्यातील अजूनही गावात कुणबी च्या नोंदी सापडल्या असून त्याचे भाषांतर झाल्यानंतर त्याही याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत वरील गावांमध्ये या नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तरी संबंधित गावातील कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांनी नातेवाईकांची वंशावळ तयार करून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे