फलटण चौफेर दि २४
सामायिक जमीन वाटून देत नाही या कारणाने दुधेबावी तालुका फलटण गावातील ज्ञानदेव महादेव सोनवलकर वय ४० रा दुधेबावी यांना दि ४ जुलै २०२०रोजी लोखंडी पाईप, कुऱ्हाड, लोखंडी गजाने मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी अनिकेत हणमंत सोनवलकर वय २३ वर्ष, शंभुराज हणमंत सोनवलकर वय २१ वर्ष रा दुधेबावी यांना जन्मठेप व प्रत्येकी तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे तर हणमंत महादेव सोनवलकर वय ४८ वर्ष, सुनिता हणमंत सोनवलकर वय ३८ वर्ष, यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस उप-निरीक्षक यु. एस. शेख फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी करुन मा. न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.सदरचा खटला व्ही. आर. जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सो, सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे श्रीमती वैशाली पाटील सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद केसमध्ये एकुण ११ साक्षीदार तपासले, केवळ परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत न्यायालयात समोर आलेला पुरावा व सरकारी वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य मानुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सो सातारा यांनी आज दिनांक २४/०१/२०२४ रोजी यातील आरोपी क्र.३ व ४ यांना भा. द. वि. कलम ३०२, ३४ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी रु.३,००,०००/- दंड, दंड न दिलेस १ वर्ष साधा कारावास अशी शिक्षा दिली आहे. सदर दंडाच्या रकमेपैकी रक्कम रु.५,००,००० इतकी नुकसान भरपाई मयताच्या कुटुंबियांना देण्यात यावी. तसेच आरोपी क्र.१ व २ यांना CRPC २३५ (१) अन्वये ३०२ या शिक्षा पात्र गुन्हयासाठी निर्दोष मुक्त करणेत आले आहे.
उप-विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस फलटण विभाग फलटण, सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन म.पो. हवा साधना कदम व पो. अंमलदार बडे नेमणुक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी कामकाज पाहिले.याकामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उप-निरीक्षक श्री. उदय दळवी, श्री. सुनिल सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. मंजूर मणेर, म. पो. हवा शेख, पो. अंमलदार अमित भरते यांनी मदत केली.