फलटण चौफेर दि २४
सुरवडी ता फलटण गावाच्या हद्दीत शेतातील बांध फोडण्याच्या कारणावरून दोन गटात लाकडी काठीने लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी नुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी गणेश दत्तात्रय माडकर वय २६ रा सुरवडी यांनी संशयित अर्जुन शंकर माडकर, सचिन अर्जुन माडकर, सौरभ अर्जुन माडकर, वैभव नवनाथ माडकर, सविता अर्जुन माडकर, जयश्री नवनाथ माडकर सर्व राहणार सुरवडी व संदीप विलास पिसाळ रा वडजल यांनी जमिनीचा बांध का फोडला असे विचारला असता लाठीने,लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर दुसऱ्या फिर्यादीत फिर्यादी अर्जुन शंकर माडकर संशयित दत्तात्रय गंगाराम माडकर, भगवान दत्तात्रय माडकर, गणेश दत्तात्रय माडकर, वैशाली दत्तात्रय माडकर, प्रियांका गणेश माडकर यांनी जमिनीच्या बांधावरून सारखी भांडण का करता असे विचारले असता लाकडी दांडके व हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे पुढील तपास पोलीस हवालदार पिसे करीत आहेत।