फलटण चौफेर दि २४
फलटण तालुका शिक्षक समितीच्या आज झालेल्या सहविचार सभेत नूतन कार्यकारिणी बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यामध्ये गणेश तांबे यांची अध्यक्षपदी व संतोष मोहिते यांची सरचिटणीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संजय जाधव -शिक्षक नेते,नितीन करे-अंकुश लोखंडे-कार्याध्यक्ष,बाळकृष्ण गायकवाड- कोषाध्यक्ष इत्यादी निवडी जाहीर करण्यात आलेल्या असून-लवकरच फलटण तालुक्यात सर्व शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांचा भव्यदिव्य मेळावा घेऊन उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असणारी फलटण तालुका शिक्षक समिती कार्य करत आहे.फलटण तालुका शिक्षक समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा नेते,सुरेंद्रकुमार घाडगे,चंद्रकांत मोरे,उदयकुमार नाळे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक सिध्दनाथ देशमुख सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत बागल, जिल्हा सरचिटणीस आनंदराव सोनवलकर,सल्लागार,संपतराव मराठे,सहचिटणीस संपतराव निकाळजे,कोषाध्यक्ष धन्यकुमार तारळकर उपाध्यक्ष अमोल निकाळजे,संपर्कप्रमुख आबा देशमुख व सातारा जिल्हा शिक्षक समितीचे सर्व सभासदांनी नूतन कार्यकारिणीच्या अभिनंदन केले.