फलटण चौफेर दि २३
वडजल ता फलटण ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ रेश्मा दत्तात्रय ढेंबरे यांची बहुमताने निवड झाली वडजल ग्रामपंचायत कार्यालयात आज सरपंच निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच पदासाठी सौ रेश्मा ढेंबरे व सौ छाया दादा पिसाळ यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते गुप्त मतदानातून रेश्मा ढेंबरे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोंडके यांनी जाहीर केले यावेळी ग्रामसेवक हिम्मतराव गायकवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ रेशमा ढेंबरे यांची सरपंच पदी निवड झाल्याने त्यांचे विधान परिषदेचे मा सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण बाजार समितीचे चेअरमन रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले