फलटण चौफेर दि १९
सर्पदंश झाल्याने साखरवाडी तालुका फलटण येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे श्रीरंग जगन्नाथ मोरे वय ४० राहणार साखरवाडी यांना दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाल्याने साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे २९ नोव्हेंबर रोजी निधन झाले याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून पोस्टाने आज दि १९ रोजी कागदपत्रे फलटण ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार मोहन हंगे करीत आहेत