फलटण चौफेर दि १९
श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी प्रशालेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अपूर्व विज्ञान मेळावा, माता पालक विभागा मार्फत हळदी कुंकू, संगीत खुर्ची,डॉ बिचुकले यांचे मुलांचे मानसशास्त्र या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी प्रशालेचे प्रमुख मुख्यध्यापक शेडगे सर यांनी मार्गदर्शन केलेअपूर्व विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनीं विविध वैज्ञानिक माँडेल्स बनवून सुबकरित्या मांडणी केली होती
तसेच हळदी कुंकू या समारंभासाठी दालवडी गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संगीत खुर्ची खेळातील विजयी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक बक्षीस वाटप करण्यात आले कार्यक्रमात माता पालकांना हळदी कुंकू देऊनवान तसेच शातींकाका सराफ सन्स यांच्या कडून नववर्षाच्या निमित्ताने बँग व कँलेडर याचे वाटप करण्यात आले प्रशालेचे मुख्यध्यापक शेडगे सरांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले
या कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे प्रमुख तरटे सर, निंबाळकर सर, जाधव सर,कोलवडकर सर, सूळ सर बनकर सर, मोहितेमँडम,सस्ते मँडम, चौधरी मँडम कारंडे मामा यांनी उत्तम नियोजन केले होते कार्यक्रमाला दालवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते