फलटण चौफेर दि १९
फलटण तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती च्या अनुषंगाने आयोजित टंचाई आढावा बैठकीमध्ये पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या चारा पिकांचे योग्य नियोजन करणेबाबत मा. प्रांत अधिकारी श्री.सचिन ढोले यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे.
तालुक्यामध्ये येत्या काळात दुष्काळ भेडसावण्याची दाट शक्यता असल्यामुळे पशुपालक यांनी आपल्या पशुधनासाठी चारा पिके यांची लागवड मोठ्या प्रमाणात करावी. तसेच नगदी पिकांकडे असलेला कल कमी करून चारा पिके घेऊन तालुक्यामध्ये असणाऱ्या पशुधनास उपलब्ध होऊन पशुधनाचे टंचाई काळामध्ये सुद्धा योग्य संगोपन होईल याचे नियोजन करावे. ज्या भागात सध्य परिस्थितीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी चारा पिकांची लागवड करण्यात यावी. तसेच उपलब्ध असलेल्या हिरवी वैरणीपासून मुरघास तयार करावा आणि जनावरांच्या आहारात त्याचा समावेश केल्यास चारा टंचाई कमी करण्यास मदत होईल. कमी पाण्यावर येणारी वैरण पिके याची सुद्धा लागवड करण्यात यावी. वाळलेला चारा याचा सुद्धा जनावरांच्या आहारात योग्य वापर केल्यास जनावरांचे संगोपन होण्यास मदत होईल.
सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी आमदार दीपकराव चव्हाण,अध्यक्ष जि.प. संजीवराजे नाईक निंबाळकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे तसेच सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.