विडणी ( योगेश निकाळजे) - विडणीत आज प्रभू श्रीराम यांचा भव्य मिरवणूक सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने विडणीत आज सोमवार दि.२२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक विधी होणार आहेत,दुपारी २ ते ५ वाजता भजनी मंडळांचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सायंकाळी ५ते ७ वाजता प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर ७ वा. प्रभु श्रीराम प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन होणार आहे.
सायंकाळी ७.३० वाजता उत्तरेश्वर चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक - निंबाळकर,आमदार दिपकराव चव्हाण ,श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक - निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर,श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉॅ.बाळासाहेब शेंडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
सदर सभेचा कार्यक्रम झाल्यानंतर उत्तरेश्वर हायस्कुलसमोर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आला आहे.