प्रभू रामाच्या अनेक आदर्श व्यक्ती महत्त्वापैकी 'आदर्श पुत्र '
ज्यावेळी विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणासाठी, महाराज दशरथ राजांनी त्यांना जायला सांगितले, तेव्हा श्रीरामाचे वय केवळ पंधरा ते सोळा वर्षाच, मौज, मजेत, राहण्याचे वय, परंतु कोणताही विरोध न दर्शविता पित्याची आज्ञा म्हणून विश्व मित्रांबरोबर ते निघून गेले, ज्यावेळी आपल्याला आता थोड्याच वेळात यौव राज्याभिषेक होणार या अत्युच्च आनंदाच्या क्षणी काय कैकयी मातेच्या महालात गेले, तेव्हा महाराज दशरथ गल्लीत गात्र होऊन दुःखात बुडालेले दिसले, अत्यंत काळजीने त्यांनी चौकशी केली तेव्हा काही काही म्हणाली, त्यांना काहीही झालेले नाही, त्यांच्या मनात जे आहे ते तुला सांगू शकत नाहीत, मी तुला सांगते, पण ते तू मान्य करणार असशील तरच! श्रीराम म्हणाले पित्याचा एक शब्दही मी मोडणार नाही, तेव्हा कैकयी म्हणाली त्यांनी मला दोन वर दिले आहेत, एका वराने तुझ्या ऐवजी माझ्या भरताला राज्याभिषेक, आणि दुसऱ्या वराने तुला चौधा वर्षे वनवास, कैकयीची ही भयंकर वाणी ऐकूनही श्रीराम अत्यंत शांत होते, नम्रपणे ते म्हणाले माते मी पित्याची आज्ञा कधीच ही मोडणार नाही, त्यांना वचनभंग केल्याचा कलंक मी लागू देणार नाही, मी या क्षणी वनात जायला तयार आहे, आणि भरत राजा होणार याचा मला आनंदच आहे, कारण भरत मला प्राणाहून प्रिय आहे, माते तुला हे सर्व पाहिजे होतं तर तू मला सांगायचं, माझ्या वडिलांना, या वयात वर मागून उगाचच त्रास दिलास, वनवासात जाण्याच्या दुःखापेक्षा, माते तुझा माझ्यावर विश्वास नाही, याचे मला अधिक दुःख होत आहे.
राजा दशरथ वारंवार सांगत होते ,
रामा तू वनात जाऊ नकोस, तरीपण दिलेला शब्द पाळण्यासाठी ते वनात निघून गेले, कौशल्या म्हणाली मी तुझ्याबरोबर वनात येते, तेव्हा पतीव्रता पतीला सोडून कुठे जात नसत, पतीची सेवा हाच तिचा धर्म असतो. म्हणून तू इथेच राहून पतीची सेवा कर, असा उपदेश त्यांनी आपल्या आईला केला, हे सर्व पाहिलं की श्रीरामाच्या मनाची उंची आकाशाएवढी होती हे जाणवतं!
परंतु आज आपण पाहतो, आजची मुलं आपल्या वृद्ध माता-पित्यांशी कशी वागतात, त्यांना प्रेमाने वागवत नाहीत, आज कित्येक सदन मुलांचे आई-वडील वृद्धाश्रमात जीवन कंठीत आहेत, मनातून दुःखी राहून एकमेकांना आधार देत आहेत, काही मुलांनी एकाच घरात राहून आई-वडिलांची स्वतंत्र खोली केली आहे, कित्येक मुले आई-वडिलांशी संभाषणही करीत नाहीत त्यांनी आजच्या या अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना या शुभ प्रसंगापासून श्रीरामाचा आदर्श घ्यावा, आणि आपल्या वृद्ध आई-वडिलांना प्रेमाचा आधार द्यावा हेच तर रामायणातून शिकायचं आहे,
श्रीराम जय राम जय जय राम
श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फोन. ९९७०७४९१७७