फलटण चौफेर दि २१
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अरुण देवकर यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, मौजे पेरले तालुका कराड गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे महामार्गालगत असले सेवा रस्त्यावर संशयित नितीन आत्माराम जाधव वय ३२ रा गोसावीवाडी ता कराड व अमोल सुरेश गायकवाड वय ३८ रा गायकवाड वाडी तालुका कराड हे सांबर या वन्य प्राण्याच्या शिंगाची तस्करी व विक्री करणेकरीता येणार आहेत अशी त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी पडताळणी करुन कारवाई करणेबाबत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले त्याप्रमाणे नियुक्त पथकाने सदर ठिकाणी जावुन वेशांतर करुन सापळा लावुन पाळत ठेवुन संशयीत वावरणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात पांढरे रंगाचे पोत्यामध्ये सांबर या वन्य प्राण्याचे दोन मोठी शिंगे मिळून आली केले कारवाईमध्ये नमुद शिंगांसह तस्करी करणेकरीता वापरलेल्या मोटार सायकलसह किं. रु. ५,३५,०००/- चा मुद्देमाल जप्त करणेत येवुन दोन्ही इसमांविरुध्द उंब्रज पोलीस स्टेशन येथे वन्य प्राणी अधिनियम १९७२ या कायद्यांन्वये गुन्हा दाखल करुन कारवाई करणेत आली आहे.सदर कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडील पोलीस अधिकारी पोलीस निरिक्षकअरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. रविंद्र भोरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. रोहित फार्णे, पोलीस उप निरिक्षक श्री. विश्वास शिंगाडे, सहाय्यक पोलीस फौजदार श्री.सुधीर बनकर, पो. हवा. साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, लक्ष्मण जगधणे, सनी आवटे, मनोज जाधव, मुनीर मुल्ला, राजु कांबळे, अमोल माने, अमित झेंडे, अमृत कर्पे, शिवाजी भिसे, पो. कॉ. केतन शिंदे, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, मोहसीन मोमीन, स्वप्निल दौंड यांनी सहभाग घेतला असुन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.वन्य प्राण्यांचे शिकार करणारे व अमुल्य ठेवा म्हणुन असलेल्या त्यांच्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुध्द ठोस व परिणामकारक कारवाई यापुढे चालू राहिल असे पोलीस निरिक्षक अरुण देवकर यांनी सांगितले