Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माढ्यात महाविकास आघाडीचा उमेदवारच जिंकणार : अभयदादा जगताप प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट)

 



फलटण चौफेर दि २० पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज फलटण येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असणारे मा अभयदादा जगताप यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले

                  माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून इच्छुक असताना माझ्याकडे माढा लोकसभेसाठी विकासाचा  आराखडा तयार आहे ज्या वर कधी काम झाले नाही एक इच्छुक उमेदवारापेक्षा मी महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी सध्या जे विखुरलेले सैन्य आहे महाविकासाकडे ते एकत्र करायचं काम करतोय .उमेदवार कोणीही असला तरी त्याच्या पाठीशी या सैन्याने उभं राहावं आणि सर्वांनी एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवाराचा सामना करावा अशा पद्धतीची परिस्थिती यावी यासाठी मी प्रयत्न करतोय. खरंतर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वच्या सर्व आमदार हे भाजप प्रणित आघाडीमध्ये आहेत त्यामुळे जे मागे राहिलेले लोक आहेत ते शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे उद्धव ठाकरे साहेबांच्यावर प्रेम करणारे राहुल गांधींच्यावर प्रेम करणारे आणि एकंदरीत ज्यांची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी सुसंगत आहे अशी लोकं मागे राहिलेले आहेत


                   यावेळी बोलताना जगताप पुढे म्हणाले  मागे राहिलेल्या  या सर्वांना एकत्रित करून पुनश्च एकदा महायुतीचे उमेदवाराशी दोन हात करण्यासाठी तयार करायचे हा प्रयत्न माझ्याकडून चालू आहे  यामध्ये यश आम्हाला नक्की यश मिळेल आणि येत्या काळात माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणूक जिंकेल याचा मला पूर्ण विश्वास वाटतो

             या भागात फिरताना  करमाळापासून जनतेमध्ये भाजपच्या विविध धोरणाविषयी प्रचंड रोष आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या विषयी प्रचंड प्रेम आणि सहानभूती आहे लोकांना कळतंय की आता बदल आपल्याला केला पाहिजे फक्त एक नेतृत्व नाहीये किंवा लोकांना एकत्र केलं पाहिजे ते होत नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अशा या नियोजनातील अभावामुळे जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करतोय उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचे नाही परंतु महाविकास आघाडी विशेषता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जर राष्ट्रवादी पक्षालाही सीट मिळाली तर राष्ट्रवादी पक्षाचा या ठिकाणी उमेदवार निवडून कसा येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे असे अभयदादा जगताप यांनी सांगितले

             

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.