फलटण चौफेर दि २०
अयोध्येत नव्याने बाधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या तीर्थक्षेत्र येथे होत आहे. यानिमित्ताने मलठण येथे श्रीरामरक्षा, मंतपठण, भजन व महाआरती,महिलांसाठी हळदी कुंकु या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.हे सर्व कार्यक्रम कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण येथे २२ जानेवारी रोजी सायंकाळी ९ ते ७ या दरम्यान संपन्न होणार आहेत.यावेळी सर्व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका व शना भाजपा आध्यात्मिक आघाडी व महिला भाऊ आघाडीतर्फे करण्यात आले आहे.