विडणी (योगेश निकाळजे) - खा रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून विडणीतील रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती विडणी गावचे सरपंच सागर अभंग यांनी दिली.
विडणी गावातील प्रमुख जिल्हा मार्ग प्रजिमा 88 मधील पालखी तळ पंढरपूर रोड ते विद्यानगर अभंगवस्ती रस्त्यासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच प्रजिमा 108 मौजे विडणी 24 फाटा कॅनॉल ते मोडूकाई मंदिर 26 फाटा या रस्त्यासाठी 2.5 कोटी असा एकूण 5 कोटी रुपयांचा निधी माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खा रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आला आहे .
विडणी गावातील रस्त्यांसाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याबदल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांचे समस्त विडणी ग्रामस्थांकडून आभार व्यक्त होत असून पूर्वीही या दोघांच्या माध्यमातून विडणी गावात विविध विकास कामे झाली असून यापुढेही विडणी गावचा विकास यांच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला.