विडणी (योगेश निकाळजे) -
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर विडणी या शाळेने नेत्र दीपक यश मिळवले आहे शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत यामध्ये संस्कृती संतोष नेरकर 268 गुण प्रगती मंगेश शेंडे 266 गुण अंजली संतोष माने 266 गुण, शार्विल अमोल कर्णे 256 गुण, प्रणाली प्रशांत अभंग 234 गुण, या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. शाळेची विद्यार्थिनी आर्या बापूराव काळुखे हिला 226 गुण मिळाले अवघ्या 2 मार्काने गुणवत्ता यादीतील तिचे स्थान हुकले.
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये शाळेच्या 3 विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेच्या प्रतीक्षा यादी मध्ये शाळेचा शार्विल अमोल कर्णे याची सैनिक स्कूल सांगली येथे तर सिद्धी भूषण अहिरे या विद्यार्थिनीची निवड सैनिक स्कूल चंद्रपूर येथे झाली आहे. याशिवाय इतर खासगी स्पर्धा परीक्षांमध्ये ही शाळेने आपला ठसा उमटवला आहे. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा मध्ये शाळेचे 10 विद्यार्थी, तर ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी मार्फत घेण्यात आलेल्या ज्ञानंजन परीक्षेमध्ये 11 विद्यार्थी चमकले आहेत.
या विद्यार्थ्यांना सौ.रेश्मा कोरडे, श्री रवींद्र परमाळे, सौ पौर्णिमा अभंग यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा. गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण मॅडम, मा. विस्तार अधिकारी चन्नया मठपती साहेब, मा. अनिल संकपाळ साहेब, विडणी केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनंदा बागडे मॅडम , मा. श्री धीरज अभंग अवर सचिव मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य , सरपंच सागर अभंग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन अभंग , सदस्य सुभाष अभंग , युवा उद्योजक किशोर ननावरे ,सचिन ननावरे , कुंदन शेंडे ,टाटा मोटर्सचे अधिकारी अमोल अभंग, संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे ,व्यवस्थापन समिती सदस्या ज्योती शेंडे, सारिका ननावरे यांनी अभिनंदन केले आहे.