Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचा चाचणी इशारा' फलटण तालुक्यातील बहुतांशी मोबाईल धारकांच्या मोबाईलवर इशारा आल्याने तर्कवितर्क 202325

 


साखरवाडी गणेश पवार

आज सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास फलटण तालुक्यातील बहुतांश मोबाईल धारकांच्या मोबाईलवर

मोबाईलचे कंपन होऊन मुख्य स्क्रीनवर  एक इमर्जन्सी अलर्ट मध्ये  'हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एकच चाचणी इशारा आहे' अशा आशयाचा संदेश एकाच वेळी बहुतांश मोबाईल धारकांना आल्याने व याबाबत कोणालाही अधिक माहिती नसल्याने मोबाईल धारकांची भीतीने गाळण उडाली काहींनी तात्काळ हा मोबाईल हॅकिंग चा प्रकार असू शकतो असे समजून  मोबाईल बंद  केले

  याबाबत फलटण येथील दूरसंचार कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले

मात्र  सध्या राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असल्याने भारत सरकारच्या वतीने रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दरड प्रवण क्षेत्रात जावू नये; आपली, कुटुंबीयांची व मित्रपरिवाराची काळजी घेण्याबाबत हा इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

फोनमधील इमर्जन्सी अलर्ट फीचरमुळे यूजर्सना अतिवृष्टी, भूकंप,त्सुनामी अशा घटनांचा इशारा मिळत असल्याचे जाणकार सांगत आहेत


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.