साखरवाडी(गणेश पवार)
फलटण तालुक्यातील सोनवडी बुद्रुक येथे सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे एका मजूर महिलेवर 5 नराधमांनी अत्याचार केला असून पाच जणांविरोधात ॲट्रॉसिटी व अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे हसन शेख वय 26 रा सोनवडी बुद्रुख ता फलटण व त्याच्या इतर चार अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे
फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या व पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित हसन शेख यांने पीडितेच्या पतीला दहा हजार रुपये देऊन त्याच्याकडे कामाला ठेवले होते व दिनांक 19 जून रोजी फिर्यादीच्या मुलांना आरोपीने स्वतःच्या ताब्यात ठेवून पतीला कामाला लावून रात्री ८.३० ते २० जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या मनाविरुद्ध संशयित व त्याच्या चार साथीदारांनी अत्याचार केल्याचे व याबद्दल कोणाला सांगितल्यास मुलाला मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सदर घटनेने सम्पूर्ण फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास उपविभागीय अधिकारी राहुल धस करीत आहेत.