साखरवाडी(गणेश पवार)
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूर येथून संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य यात्रेचा शुभारंभ होणार आहे या जनस्वराज्य यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रासपचे फलटण तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले आहे.
तसेच मंगळवार दिनांक ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता फलटण येथील आंबेडकर चौकात जाहीर सभा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले आहे.
पंढरपूर येथून या याञेचा शुभारंभ दिनांक १० जुलै रोजी होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून शेकडो गाड्यांची ही रॅली जाणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मिशन माढा लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक शक्ती स्थळांना अभिवादन करत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या रॅलीचे सभेत रूपांतर होऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.