साखरवाडी(गणेश पवार) : नीरा उजव्या कालव्याचे अस्तरीकरण थांबवावे, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महिला आघाडी तालुकाध्यक्ष निशा माने यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, प्रांत विभाग, जलसंपदा विभाग,गट विकास अधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील नीरा उजव्या कालव्याचे जे अस्तरीकरण चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर यांचा तीव्र विरोध आहे याची दखल घेऊन प्रशासनाने या ठिकाणी सुरू असलेले सिमेंट अस्तरीकरणाचे काम तातडीने बंद करावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी
राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाल, फलटण तालुका सरचिटणीस अशोक नाना लंबाते, फलटण तालुका युवक अध्यक्ष निलेश लांडगे ,पुरंदर तालुका अध्यक्ष बंटी निगडे , तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ, सुरवडी गाव युवा नेते सागर माडकर, युवा नेते धनाजी लकडे,युवा नेते बाजी नाना सोनवलकर,युवा नेते विक्रम माने,पंचायत समिती गण प्रमुख वैभवराज नरूटे , डोंबाळवाडी गाव प्रमुख शशी काका पिसाळ , राजेंद्र डोंबाळे, दादा कोळपे,तरडगाव युवा नेते रणजित कुलाळ, दादा सुळ ,विकास नरूटे आदी मान्यवर उपस्थित होते