फलटण चौफेर साखरवाडी
दर तीन वर्षातून येणाऱ्या अधिक महिन्यात, साखरवाडी ते पंढरपूर सद्गुरु गुणानाथ महाराज पायी वारी मध्ये, गावातील लहान थोर स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने या वारीत सामील होतात
देवांचे अवतार असतात, व संतांचेही अवतार असतात, परंतु देव व संत यांच्या अवतारात फार फरक आहे, दोघांनाही एकच कार्य करावयाचे असते, परंतु भगवंतांना जे जमत नाही ते साधुसंत करून दाखवतात आपल्या भजन कीर्तन प्रवचनाने जगतात आनंदाचा प्रसार करणे हे होय, परंतु दोघांच्या कार्य करण्याच्या पद्धतीत मात्र फरक असतो, देवाला दृष्टांचा संहार करावा लागतो, परंतु संत साधूंना दृष्टांना मारल्याचे एकही उदाहरण, संत चरित्रामध्ये आढळून येत नाही,
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसारखे साधू, संत, हे प्रत्यक्षात भगवंताचेच अवतार होत.
अवतार तुम्ही धराया कारण.....
जगाच्या कल्याणासाठी भगवंताला संतांच्या रूपात अवतार धारण करावे लागले,
संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या शिष्य परंपरेतील सद्गुरु श्री. रंगनाथ महाराज यांचे शिष्य इ.स.१६९० या काळात श्री सद्गुरु परब्रम्ह गोपाळनाथ महाराज, हे एक थोर योगी ब्रह्म व्यक्ती महापुरुष होऊन गेले* श्रीनाथांची ग्रंथसंपदा, तसेच महाराष्ट्रभर पसरलेला शिष्य शाखांचा विस्तार, परंतु काळाच्या ओघात त्यांची बरीच ग्रंथसंपदा नष्ट झाली, सातारा शहरापासून पूर्वेस सातारा सोलापूर रस्त्यावर साताऱ्यापासून ११ किलोमीटर अंतरावर त्रिपुटी येथे त्यांची संजीवन समाधी आहे,
गोपाळनाथ महाराजांचे कार्य चरित्र महाराष्ट्रभर विखुरलेल्या त्यांच्याशी संबंधित स्थाने मठ आसने मंदिरे, त्यांचे वाडमय, त्यांच्या शिष्य शाखा आजही कार्यरत आहेत....
सद्गुरु श्री परब्रम्ह गोपाळनाथ महाराज यांच्या उल्लेखिलेल्या नाथ लिला चरित्रामध्ये, बालपण ते मौजीबंधनापर्यंत सद्गुरूंची सेवा नंतर इ.स सन १७०० ते १८५० या काळामध्ये ब्रह्मचैतन्य सद्गुरु योगीराज गुणानाथ महाराज यांच्या प्रतीक स्थानाचे वर्णन आहे
शके.१७४२ म्हणजेच इ.स.१८२० अवतार कार्य संपवून मंगलदायी अशा शुभ मंगळवारी प्रातः समयी, रवी उदयाच्या पूर्वी पुरातन भोसलेवाडी, आत्ताची पिंपळवाडी येथे, संत सज्जनांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात संजीवन समाधी घेतली*. संत परंपरेप्रमाणे त्यांचेही शिष्य गण आहेत, त्यामध्ये सद्गुरु माता आबई पवार महाराज, सद्गुरु शिपटे तात्या महाराज, (आदर्की. ता. फलटण ) यांनी सद्गुरूंच्या मंदिरा जवळच समाधी घेतली. श्री सद्गुरु सदुबुवा महाराज, यांची पिंपळवाडी नजीकच भोसले वस्ती येथे आहे, सद्गुरु काकोबा दादा ढेंबरे यांची मरणोत्तर समाधी साखरवाडी येथे ढेंबरे वाड्यात आहे, सद्गुरु योगीराज गुणानाथ महाराज यांनी घेतलेल्या समाधीला आज २०२ वर्ष झाली, त्यांनी घालून दिलेल्या सन्मार्गाने मंदिरात सातत्याने पूजाअर्चा, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गाथा पारायण काकड आरती, तसेच आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी, इत्यादी धार्मिक कार्यक्रम अव्याहतपणे चालू आहेत, गुणानाथ महाराज संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
माऊलींनी सांगितल्याप्रमाणे...
जय जय हो शुद्धे, उदारे प्रसिदे
अनवरत आनंदे वर्षेतीये
संतश्रेष्ठ माऊलींनी आपल्या ओवीत प्रथमता, आपल्या गुरूंचे आध्यात्मिक स्वरूप सांगून, नंतर ते काय देतात ते सांगतात,
भावार्थ..... माऊली आपल्या गुरु विषयी म्हणतात, तुमचे मन शुद्ध निर्मळ आणि पवित्र आहे*, तुमच्या दातृत्वाबद्दल फार ख्याती आहे, आपण अखंड आनंदाचा वर्षाव करणारे आहात,
गुरुची कृपा शिष्यावर अखंड आनंदाचा वर्षाव करते
नेहमी सद्गुरूंचे नाम घेऊन भजन कीर्तन प्रवचन करावे हीच भक्ती
गुरुप्रती ठेवली की आपल्याला काहीच करावे लागत नाही
तोची भार वाहे........
श्री रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी, ता. फलटण जि. सातारा. फोन नंबर, ९९७०७४९१७७

