साखरवाडी (गणेश पवार)
मुळीकवस्ती ता दहिवडी गावाच्या हद्दीतून जिहे कठापूरच्या पाणीपुरवठ्याच्या काम करणाऱ्या पोकलेन मशीनचा सुमारे १३ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा ब्रेकर चोरून नेल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयित रविराज जयप्रकाश गायकवाड (वय २५ वर्षे रा. दहिवडी ता.माण जि. सातारा), अनिल देवराम राठोड (वय ३० वर्षे रा. तुपेवाडी दहिवडी ता.माण जि.सातारा), सुजित दिलीप कांबळे (वय २७ वर्षे रा. ढोकळवाडी पोस्ट विखळे ता. खटाव जि.सातारा हल्ली रा. तुपेवाडी दहिवडी) व अक्षय किसन जाधव (वय २६ वर्षे रा. चव्हाण वस्ती वावरहिरे ता.माण जि. सातारा)यांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेला ब्रेकर सहित गुन्ह्यात वापरलेला जेसीबी, एक चार चाकी गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली असा सुमारे ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत दहिवडी पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी दि२३ रोजी सायंकाळी ५.०० ते दिनांक २४ रोजीचे सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मुळीक वस्ती ता दहिवडी गावाच्या हद्दीतून पोकलेन ब्रेकर चोरी झाल्याची फिर्याद श्रीनिवासराव सूर्यनारायणा रावपल्ली जनरल मॅनेजर आरएमएन इन्फ्रा स्ट्रक्चर लि. रा. हैद्राबाद तेलंगणा यांनी दहिवडी पोलीस स्थानकात दिली होती दिली होती
गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखुन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने यांनी घटनास्थळावरुन जाणारे रोडला व इतर परीसरात असणारे सुमारे ६० ते ६५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन त्यावरुन यांना निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन सदर गुन्हयातील चोरीस गेला माल पोकलेन ब्रेकर कि.रु. १३लाख ३३ हजार व संशयतांनी यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला जेसीबी क्रमांक एमएच११डीएच १०००, ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक केए२८ टीए ६२०५, चार चाकी गाडी क्रमांक एमएच१२क्युटी ३९६४ असा एकुण ७६ लाख ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाईत पो हवा बापु खांडेकर,धनंजय घाटगे,पो ना स्वप्नील म्हामणे,पो कॉ रामचंद्र गाढवे,अजिनाथ नरबट, सुहास गाडे,सागर लोखंडे, निलेश कुदळे यांचा सहभाग होता
