Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटणच्या २० कोटी विकास कामांची स्थगिती उठवली आ.दीपक चव्हाण यांची माहिती 202334

 


साखरवाडी(गणेश पवार)

 फलटण नगरपरिषदेच्या  स्थगिती दिलेल्या  विकास कामांना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून स्थिगिती उठवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच फलटण तालुक्याच्या विकासासाठी आगामी काळातही चांगला विकास निधी प्राप्त होणार  असल्याचे आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले 

श्रीमंत  रामराजे नाईक निंबाळकर  यांच्या लक्ष्मी विलास पॕलेस  निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.

 महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात पुरवणी बजेटमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर झाली होती, परंतू या कामांना या  सरकारने स्थगिती दिली होती. परंतु  या कामांवरील स्थगिती उठविली असल्याचे स्पष्ट करुन आमदार चव्हाण यांनी सांगून स्थगिती उठविण्यात आल्याने फलटण शहर हद्दीतील वीस कोटी बत्तीस लाख रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत.लवकरच या कामांना सुरुवात होईल. सदर कामांमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ५ कोटींच्या व महाराष्ट्र शासन वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १५ कोटी अशा एकुण २० कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील काही अन्य विकास कामांनाही स्थगिती देण्यात आली असून याही कामांवरील स्थगिती उठविण्यात यावी यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. या कामांवरीलही स्थगिती उठेल व याबरोबरच आणखीन विकास कामांच्या मंजूरीची आम्ही मागणी केली असुन आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून लवकरच आणखी भरघोस विकास निधी प्राप्त होईल.


गत तीस वर्षात फलटण नगरपरिषद व तालुक्याचा मोठा कायापालट रामराजे यांच्या माध्यमातून झाला आहे. अनेक विकास कामे मार्गी लावल्याने आज फलटण शहरात ठोस विकास दिसत आहे व आगामी काळात अन्य विकास कामे पुर्णत्वास जातील, असा विश्वास व्यक्त करुन स्थगिती उठवून कामांना मंजुरी व निधी दिल्याबद्दल आमदार दीपक चव्हाण यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना फलटण तालुक्याच्यावतीने धन्यवाद दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.