साखरवाडी(गणेश पवार)
सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खा लोकनेते कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर.
यांचे स्वप्न असलेले,माढा मतदार संघाचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून,
फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून फलटण नगर परिषदचे नगरसेवक भारतीय जनता पार्टी फलटण तालुका अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष.अशोकराव जाधव यांच्या प्रयत्नातून ,निर्माण झालेल्या श्री विश्वकर्मा लोहार समाज भवन चे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. हा कार्यक्रम लोहार समाजासाठी खूप आनंददायी व अभिमानास्पद होता.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उर्वरित काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन यावेळी दिले तसेच यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील समाज बांधव व मलटण परिसरातील अनेक नागरिक लोहार समाजाचा मित्रपरिवार तसेच फलटण तालुक्यातील संपूर्ण लोहार समाज बहुसंख्येने उपस्थित होते
.jpg)