साखरवाडी(गणेश पवार)
कुरवली खुर्द येथे दोन अल्पवयीन मुलांच्या झालेल्या भांडणाच्या रागातून पीडित दलित महिला व अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयतांवर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि. २३ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन शाळकरी मुलांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून संशयितांनी पीडित महिला व अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग केल्याची फिर्याद दिली असून दि. २३ रोजी सायंकाळी कुरवली खुर्द, ता. फलटण गावातील वृद्धाश्रमासमोर पिडित महिलेची अल्पवयीन मुलगी व संशयताची अल्पवयीन मुलगी या लहान मुलांमध्ये झालेल्या मांडणाच्या कारणावरुन संशयित व त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी पिडित दलित महिला व अल्पवयीन मुलगी यांना हाताने मारहाण करुन पिडित महिलेचा व त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.
.jpeg)