साखरवाडी (गणेश पवार)
सुरवडी गावचे ग्रामसेवक शिवाजी राऊत यांचा ग्रामसेवक म्हणून मागील चार वर्षाचा सुरवडीतील कार्यकाळ हा आदर्शवत असून शिवाजी राऊत यांनी ग्रामस्थांना अधिकारी पदाचा कोणताही बडेजाव न करता सर्वांमध्ये मिसळून सर्वसामान्यांच्या केलेल्या कामांमुळे त्यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली होती असे गौरवोद्गार फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी ग्रामसेवक शिवाजी राऊत यांच्या निरोप समारंभावेळी काढले
सुरवडी गावचे ग्रामसेवक शिवाजी राऊत यांनी जुलै २०१९ ते जुलै २०२३ अशी चार वर्ष सुरवडीचे ग्रामसेवक म्हणून कार्यभार पाहिला नुकतीच त्यांची विस्तार अधिकारी पदी बढती झाल्याने सुरवडी ग्रामपंचायत मार्फत त्यांच्या निरोप समारंभ चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सुरवडी गावच्या सरपंच शरयू साळुंखे पाटील, उपसरपंच विजय खवळे, माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, पोलीस पाटील संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव,सूर्यकांत पवार,बापू माडकर,नीता गाडे,संगीता जगताप,ज्योती जगताप,लीना जाधव,रेखा गोरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग पवार, माजी उपसरपंच बाळासाहेब जगताप, दीपक साळुंखे पाटील, ज्ञानदेव साळुंखे, सोपान जगताप, रमेश जगताप, संदीप सगरे, दीपक पन्हाळे, नितीन जाधव,विलास गाडे, ग्रामपंचायत चे कर्मचारी व सुरवडी ग्रामस्थ उपस्थित होते
.jpg)