साखरवाडी (गणेश पवार)
मोती चौक रविवार पेठ येथे
हातभट्टीची दारु विक्री करण्याचे उद्देश्याने आढळून आल्या प्रकरणी शहर पोलिसांनी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 16 रोजी सायंकाळी 6.30 वाजता हेमंत दत्ता शिरतोडे ( रा. मोती चौक रविवार पेठ फलटण जि.सातारा) याने त्याच्या राहते घराचे भिंतीचे आडोश्यास उघडयावर कॅनमध्ये बेकायदा बिगर परवाना एकुण 3 हजार रूपये किंमतीची हातभट्टीची दारु स्वताचे आर्थिक फायद्या करीता विक्री करण्याचे उद्देश्याने आढळून आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हेमंत दत्ता शिरतोडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
.jpeg)