साखरवाडी(गणेश पवार)
नीरा देवघर धरणाची फलटण ते माळशिरस पर्यंतच्या मुख्य बंदिस्त नलिकेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाची निविदा आज प्रसिद्ध झाले असून लवकरच या कालव्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली याबाबत अधिक माहिती देताना खासदार पुढे म्हणाले, फलटण, माळशिरस, सांगोला तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या या प्रकल्पाबाबत ४० वर्षे तालुक्याच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी फक्त राजकारण केले आहे. अगदी मृतप्राय झालेल्या या योजनेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवसंजीवनी देऊन फक्त मान्यताच नाही तर निधीही दिला आज त्यांच्या वाढिवसानिमित्त या योजनेचे टेंडर प्रकाशित करून माढा लोकसभेतील जनतेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानावेत व या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात म्हणून आजच्या दिवशी टेंडर प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले या कामासाठी एकुण २९५० कोटी खर्च अपेक्षित आहे त्यातील पहिल्या टप्प्याचे किमी ६६ ते ७६ चे २३५ कोटी चे निविदा प्रसिद्ध झाली आहे .लोणंद ते फलटण तालुक्याच्या हद्दीपर्यंत काम पुर्ण होणार हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे त्यामुळे या वर्षाखेरपर्यंत माळशिरस च्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले जाणार आहे . या कालव्यामुळे खंडाळा फलटण माळशिरस व पंढरपूर -सांगोल्यातील काही भाग या भागाला पाणी उपलब्ध होऊन या भागाचा कायमस्वरूपी चा दुष्काळ संपणार आहे.या तिन्ही तालुक्यातील गावातील लोकांना यांचा फायदा होईल माझ्या व मतदार संघाचे दृष्टीने हा. भाग्याचा क्षण असल्याची माहिती खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिली .कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी या दुष्काळ संपवण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होताना दिसत आहे फलटण तालुक्यातील गावाना याचा लाभ होणार आहे गेली अनेक वर्ष या तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत परंतु मी खासदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळाचा विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठका घेऊन यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन आज निविदा प्रसिद्ध झाली त्यामुळे या तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही खासदार झाल्यानंतर या तालुक्यातील इंच ना इंच जमीन भिजवण्याचे हे स्वप्न मी पाहिलं होतं ते आज राज्य सरकारने पूर्ण केल्याने आम्हाला आनंद होत आहे या तालुक्यातील जनता फलटण तालुक्यात तीन कॅनॉल जाताना पाहाणार आहे .. भविष्यातील नवीन तरुण पिढी ही रोजगारासाठी आता मुंबई पुण्यामध्ये नोकरीला जाणार नाही स्वतःचे शेतीबरोबरच व्यवसाय सुद्धा आता आपल्या तालुक्यामध्ये करताना दिसणार आहे त्यामुळे या तालुक्यातील हरितक्रांती बरोबरच आर्थिक क्रांती सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यानंतर शेती बरोबरच युवकांचे हाताला काम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सांगितले
