Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अवघ्या 5 तासात उघडकीस आणला सोन्याचे मंगळसूत्र चोरीचा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पथकाची कारवाई202331

 


साखरवाडी(गणेश पवार)

  वावरहिरे ता माण गावातील बंद घर दि 21 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास  फोडून सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे कानातील झुमके अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेले बाबत दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्हयाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने तात्काळ गावात जाऊन माहिती घेतली असता गोपनीय माहिती समजली की संशयित प्रदीप प्रकाश धर्माधिकारी वय 26 वर्ष हा इसम काही दिवसांपासून संशयास्पदरीत्या गावात व इतर परिसरात हालचाली करत आहे..

 या अनुषंगाने शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्यानी हा गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने त्याला अटक करून त्याने लपवून ठेवलेले मंगळसूत्र व झुमके त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले  सदर कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पो हवा दया डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटोळे व पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट यांनी सहभाग घेतला होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.