विडणी -(योगेश निकाळजे) - विडणी येथे संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला .
सोमवार दिनांक 10 जुलै ते सोमवार दि.17 जुलै या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दि.10 जुलै रोजी सकाळ8 वाजता श्रीक्षेत्र अरण येथून पुण्यज्योतीचे आगमन झाले या सप्ताहात रोज पहाटे 4 ते 6 श्रींची पुजा, काकडा आरती भजन सकाळी 8 ते 10 पोथी वाचन सायंकाळी 6 ते 8 वाजता हरीपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच या सप्ताहात ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर महाराज कर्चे (माळशिरस) हभप श्री केशव महाराज मुळीक ( लासुर्णे) हभप श्री.श्रीराम महाराज पुरोहित(कर्जत) हभप श्री संकेत महाराज यादव ( मिरढेकर) हभप श्री. काकासाहेब पहाणे(आळंदी देवाची) हभप श्री राहूल महाराज इंदापूरकर हभप श्री कबीर महाराज आतार इत्यादींचे किर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले तर हभप श्री सागर महाराज बोराटे नातेपुतेकर यांचे काल्याचे किर्तन झाले रविवार दि.16 रोजी सकाळी सुर्योदयावेळी श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तर सोमवार दि 17रोजी दुपारी 2 वाजता श्रींची दिंडी सोहळ्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली तर सायंकाळी 5 वाजता भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.